कदाचित तुमचा ब्रेक-अप झाला असेल आणि तुम्हाला तुमच्या पूर्वीच्या जोडीदाराशिवाय आयुष्य हरवल्यासारखे वाटत असेल.
किंवा कदाचित तुम्ही अशा नातेसंबंधात असाल ज्यात "बंधन वाटत असेल आणि तुम्हाला याची खात्री नाही. तुम्ही प्रामाणिक आहात, परंतु नेमकं काय करावं हे कळत नाही.
तुमच्या आयुष्यातील लोकांच्या तुमच्या भविष्यासाठी उत्तम योजना आहेत — पण तुमची स्वतःची स्वप्ने आहेत, त्यामुळे तुम्हाला सभोवतालच्या परिस्थितीमुळे आयुष्य फाटल्यासारखे वाटत आहे.
बऱ्याचदा असंच होतं, आपल्यालाच माहिती नसतं-कळत नसतं आपल्याला नेमकं काय हवं आहे.
अशावेळी मानसतज्ज्ञाचा सल्ला, मार्गदर्शन तुम्हाला मोलाचं ठरू शकते.
मानसतज्ज्ञांकडे किंवा क्लिनिकल सायकॉलॉजिस्टकडे फक्त 'वेडे' लोक जातात असा सर्वांचा समज असतो. खरं पाहिले तर रोजच थोड्याफार प्रमाणात मदतीची गरज सर्वांनाच असते. अशावेळेस आपल्याला कोणाशी तरी बोलून बरं वाटत असतं. अनेकदा आपण आपले मित्र-मैत्रिणी, पालक, शिक्षक यांच्याशी बोलून समस्यांवर उपाय शोधत असतो. मात्र अशी व्यवस्था नसेल आणि त्यांना सांगता येत नाहीत असे प्रश्न आपण काउन्सिलर आणि मानसोपचारतज्ज्ञांकडे घेऊन जाऊ शकतो. काउन्सेलिंगमध्ये कोणताही उपदेश केला जात नाही. तर तिथं व्यक्तीचं बोलणं ऐकून घेतलं जातं. त्यातील नकारात्मक विचार शोधून ते व्यक्तीला सांगितले जातात. त्या नकारात्मक भावना कमी कशा करायच्या त्यावर उपाय सुचवले जातात. वर्तनात काही बदल सुचवले जातात आणि त्यासाठी मदत केली जाते. मनोविकारतज्ज्ञ, तुमच्या एखाद्या समस्येसाठी वर्तन बदलासह औषधांचीही गरज असेल तर औषधं देतात. डॉक्टरांकडे गेलो म्हणजे आपल्याला औषधे घ्यावीच लागतील असा समज करून घेऊ नये. तुम्हाला नक्की कोणत्या तीव्रतेचा त्रास आहे, त्रास नक्की कोणता आहे हे डॉक्टरच ठरवू शकतात. आपल्या मानसिक अवस्थेचं निदान आणि उपचार डॉक्टरांनाच करू द्यावं.
आयुष्य हे चिंता करण्याचं, भरपूर ताणाचं आहे त्यामुळे ताण हा जीवनाचा भाग आहे असं समजून अनेक लोक जगत असतात. सतत ताण, स्पर्धा, तुलना, असमाधान, चिंता, मानसिक अशांतता हेच जीवन समजलं जातं. त्यामुळे प्रश्न सुटण्याऐवजी ते अधिक गुंतागुंतीचे होत जातात. अनेक जण स्वतःच्या समस्यांचं स्वतःच निदान करतात. बोलताबोलता सरळ मला डिप्रेशन आलं आहे असं म्हणून मोकळं होतात. पण नैराश्य किंवा कोणत्याही मानसिक आजाराच्या संज्ञा सहज वापराव्यात इतक्या साध्या नाहीत. आपला ताण, आपल्या मानसिक आजाराच्या समस्या अनेक पातळ्यांवर असतात. त्यांचं निदान आणि उपचार करण्याचं काम आपण डॉक्टरांवरच सोपवलं पाहिजे.
आमच्याशी बोलाThis site was created with the Nicepage