तुमचं मन काय म्हणतंय?

तुम्हाला मिळालेलं आयुष्य 
हे तुमचं आयुष्य आहे. 
तुम्ही कोण आहात आणि तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचे काय आहे हे तुम्हाला जर लक्षात येत नसेल तर चला ते शोधण्यासाठी आपण एकत्र काम 
करूया.

असं काहीसं तुमचं 
होत असेल तर...

आम्ही तुमच्यासोबत !

कदाचित तुमचा ब्रेक-अप झाला असेल आणि तुम्हाला तुमच्या पूर्वीच्या जोडीदाराशिवाय आयुष्य हरवल्यासारखे वाटत असेल.

किंवा कदाचित तुम्ही अशा नातेसंबंधात असाल ज्यात "बंधन  वाटत असेल आणि तुम्हाला याची खात्री नाही. तुम्ही प्रामाणिक आहात, परंतु  नेमकं काय करावं हे कळत नाही.

तुमच्या आयुष्यातील लोकांच्या तुमच्या भविष्यासाठी उत्तम योजना आहेत — पण तुमची स्वतःची स्वप्ने आहेत, त्यामुळे तुम्हाला सभोवतालच्या परिस्थितीमुळे आयुष्य फाटल्यासारखे वाटत आहे.

आमच्याशी बोला

स्वतःला स्वीकारा

आपल्या सर्वांच्या आयुष्यात एका मर्यादेपर्यंत ताण आणि प्रश्न असतातच परंतु ते एका मर्यादेच्या पलिकडे जात असतील त्याचा आपल्या आयुष्यावर परिणाम होत असेल तर त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आपल्या मनात सुरू असलेली खदखद मानसोपचारतज्ज्ञ किंवा समुपदेशकांना सांगण्यात कोणताच कमीपणा नसतो.   प्रत्येकवेळेस डॉक्टर आपल्याला औषधेच देतात असे नाही. अनेक समस्या सुरुवातीच्या पातळीवर असतील तर समुपदेशन आणि वर्तनदोष सुधारून त्यांच्यावर मात करता येते. सर्व बाह्य उपाय वापरूनही माझ्या स्वभावात, नकारात्मक भावनेत, खिन्न विचारांत बदल झालेला नाही हे स्वीकारून लवकरात लवकर मानसिक आधार शोधणे गरजेचं आहे.

संभ्रमावस्थेतून बाहेर पडण्यासाठी 
मार्ग तयार करुया.

महाविद्यालयीन शिक्षणानंतर करिअर किंवा सेटल होण्यासाठी मोठे निर्णय घेणे कदाचित कठीण वाटू शकते. कदाचित तुमच्या कुटुंबाला किंवा मित्रांना तुमच्या इच्छेप्रमाणे गोष्टी करण्याचा दबाव तुम्हाला वाटत असेल. कदाचित तुम्ही तुमच्या निर्णयात दिशाहीन आहात. तुम्हाला माहीती आहे, की तुम्हाला काहीतरी वेगळे करायचे आहे परंतु बदल कसा करायचा हे माहित नाही. तुम्हाला काय वाटत आहे ते जाणून घेण्यासाठी आमच्याशी बोला, जीवनातील ध्येये स्पष्ट करण्यात तुम्हाला आमची सर्वोत्तम मदत होऊ शकते.

तुमचा आत्मविश्वास 
वाढवून घेवूया.

लोकांना कृपया समजून घ्या, कोणत्याही परिस्थितीत 
संघर्ष टाळा.  तुम्ही अनेकदा स्वतःचा अंदाज घेतल्यास, 
तुम्हाला तुमचे विचार आणि भावना व्यक्त करण्यात 
अधिक आरामदायक वाटण्यास मदत करू शकते. 
आमच्यासोबत शिका आत्मविश्वास 
वाढविण्याचे तंत्र.

मानस तज्ज्ञांची गरज नेमकी कधी लागते?

बऱ्याचदा असंच होतं, आपल्यालाच माहिती नसतं-कळत नसतं आपल्याला नेमकं काय हवं आहे.
अशावेळी मानसतज्ज्ञाचा सल्ला, मार्गदर्शन तुम्हाला मोलाचं ठरू शकते.

अनेकदा मनाचा गुंता सोडवण्यासाठी त्याला समजून घेणारं कुणीतरी हवं असतं. 

तज्ज्ञ मानसतज्ज्ञांचा शोध  आमच्याकडे संपतो.

आत्ताच आमची अपॉइंटमेंट घ्या

काउन्सेलिंगमध्ये काय होतं?

मानसतज्ज्ञांकडे किंवा क्लिनिकल सायकॉलॉजिस्टकडे फक्त 'वेडे' लोक जातात असा सर्वांचा समज असतो. खरं पाहिले तर रोजच थोड्याफार प्रमाणात मदतीची गरज सर्वांनाच असते. अशावेळेस आपल्याला कोणाशी तरी बोलून बरं वाटत असतं. अनेकदा आपण आपले मित्र-मैत्रिणी, पालक, शिक्षक यांच्याशी बोलून समस्यांवर उपाय शोधत असतो. मात्र अशी व्यवस्था नसेल आणि त्यांना सांगता येत नाहीत असे प्रश्न आपण काउन्सिलर आणि मानसोपचारतज्ज्ञांकडे घेऊन जाऊ शकतो.   काउन्सेलिंगमध्ये कोणताही उपदेश केला जात नाही. तर तिथं व्यक्तीचं बोलणं ऐकून घेतलं जातं. त्यातील नकारात्मक विचार शोधून ते व्यक्तीला सांगितले जातात. त्या नकारात्मक भावना कमी कशा करायच्या त्यावर उपाय सुचवले जातात. वर्तनात काही बदल सुचवले जातात आणि त्यासाठी मदत केली जाते. मनोविकारतज्ज्ञ, तुमच्या एखाद्या समस्येसाठी वर्तन बदलासह औषधांचीही गरज असेल तर औषधं देतात. डॉक्टरांकडे गेलो म्हणजे आपल्याला औषधे घ्यावीच लागतील असा समज करून घेऊ नये. तुम्हाला नक्की कोणत्या तीव्रतेचा त्रास आहे, त्रास नक्की कोणता आहे हे डॉक्टरच ठरवू शकतात. आपल्या मानसिक अवस्थेचं निदान आणि उपचार डॉक्टरांनाच करू द्यावं.

चिंता आणि ताण या सहज वापरता येणारे शब्द असले तरी त्याचे दूरगामी परिणाम मनावर होत असतात.

चिंता आणि ताणाबद्दल गैरसमज

आयुष्य हे चिंता करण्याचं, भरपूर ताणाचं आहे त्यामुळे ताण हा जीवनाचा भाग आहे असं समजून अनेक लोक जगत असतात. सतत ताण, स्पर्धा, तुलना, असमाधान, चिंता, मानसिक अशांतता हेच जीवन समजलं जातं. त्यामुळे प्रश्न सुटण्याऐवजी ते अधिक गुंतागुंतीचे होत जातात. अनेक जण स्वतःच्या समस्यांचं स्वतःच निदान करतात. बोलताबोलता सरळ मला डिप्रेशन आलं आहे असं म्हणून मोकळं होतात. पण नैराश्य किंवा कोणत्याही मानसिक आजाराच्या संज्ञा सहज वापराव्यात इतक्या साध्या नाहीत. आपला ताण, आपल्या मानसिक आजाराच्या समस्या अनेक पातळ्यांवर असतात. त्यांचं निदान आणि उपचार करण्याचं काम आपण डॉक्टरांवरच सोपवलं पाहिजे.

आमच्याशी बोला

ssmps.in