कालिदास पाटील यांच्याविषयी:

  • सायकॉलॉजिस्ट/चाईल्ड अॅण्ड फॅमिली कौन्सेलर
  • संस्थापक अध्यक्ष, 'शुश्रुषा' सल्ला, मार्गदर्शन व प्रशिक्षण संस्था इस्लामपूर
  • मा. प्राचार्य, आण्णासाहेब डांगे विशेष अध्यापक विद्यालय, पलूस
  • कार्याध्यक्ष, सायकॉलॉजिकल वेलफेअर असोसिएशन
  • मा. सचिव, राष्ट्रीय मराठी मानसशास्त्र परिषद
  • सहसचिव, शिवाजी विद्यापीठ मानसशास्त्र परिषद
  • जीवनसमृद्धी, ज्ञानसंजीवन, उर्जा, बालसंस्कार, पंचकोष विकास अशा विविध शैक्षणिक प्रकल्पांची निर्मिती.
  • आर.सी.आय. नवी दिल्ली मान्यताप्राप्त रिहॅबिलेटेशन सायकॉलॉजिस्ट
  • यशदा, मुक्तांगण पुणे आदी ठिकाणी तज्ज्ञ प्रशिक्षक व समुपदेशक
  • आकाशवाणी सांगली व पुणे केंद्रावरून भाषणे, कथाकथन
  • 'जागर प्रभावी पालकत्वाचा' या कार्यक्रमाचे निर्माते व आजवर ६० हून अधिक कार्यक्रमांचे सादरीकरण
  • सचिव, जय किसान मंडळ, येडेनिपाणी
  • वसंतदादा स्मृती व्याख्यानमालेचे ३० वर्षे सातत्याने आयोजन
  • साहित्यप्रेमी सार्वजनिक वाचनालय, इस्लामपूर यांच्यातर्फे साहित्यप्रेमी सेवारत्न पुरस्कार २००६
    सिद्धगिरी गुरुकुल फौंडेशनच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या १०० हून अधिक शाळांमध्ये शालेय मानसिक आरोग्य कार्यक्रम कार्यान्वित.
  • विविध विषयांवरील व्याख्याने, परिसंवादामध्ये सहभाग आजवर १२०० हून अधिक व्याख्याने
    'शुश्रुषा' संस्थेच्या माध्यमातून १८ वर्षाच्या कार्यानुभवातून ग्रामीण परिसरातील हजारो व्यक्तींना मानसिक आधार
  • शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमाअंतर्गत आजवर ५० हजारहून अदिक विद्यार्थ्यांचे भावनिक बुद्धिमत्ता मापन व शिक्षक प्रशिक्षण
  • आजवर १५० हून अधिक शाळा, महाविद्यालयांमध्ये जीवनसमृद्धी प्रकल्प, ज्ञानसंजीवन व विविध प्रकल्पांचे आयोजन
  • तांत्रिक व वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी ऊर्जा प्रकल्प कार्यरत
  • महाराष्ट्रातील विविध शैक्षणिक, सामाजिक संस्थांमध्ये तज्ञ मार्गदर्शक म्हणून कार्यरत.
  • ग्रामीण परिसरातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रात प्रथमच 'मुलं वाचवा' अभियान प्रारंभ
  • 'दैनिक सकाळ' मधील 'मनाच्या तळाशी...' स्मार्ट सोबती या अंकामधील 'कथा मुलांच्या व्यथा पालकांच्या' व 'फुला फुलूदे कळी उमलू दे' या सदरांचे लेखन
  • महाराष्ट्र शासन, सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्यावतीने १०५ गावांसाठी 'जागर जाणिवांचा... उमेद नव्या आयुष्याची' हा अभिनव प्रकल्प कार्यान्वित ९०२५ कुटुंबांना मानसिक आधार
  • 'शुश्रुषा' संस्थेच्या वतीने आजवर विविध, शैक्षणिक, सामाजिक, औद्योगिक प्रकल्पांमध्ये २०० हून अधिक मानसतज्ज्ञांना कार्य करण्यासाठी संधी